Thursday, July 31, 2014

विरुद्धार्थी शब्द

मराठीचा पेपर असतो.
परीक्षेत प्रश्न असतो,
'विरुद्धार्थी शब्द लिहा' आणि शब्द असतो
'सात्विक' .
बंडू खूप विचार करतो आणि उत्तर लिहितो 'सात स्ट्रॉंग'
परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात.
बंडू चंदूला विचारतो, 'चंदू सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय
लिहिलास रे?'
चंदू उत्तर देतो, 'सात खरेदी कर.'
बंडू म्हणतो,
'आयला होय रे, माझ्या लक्षातच आले नाही.
तरीच मी विचार करत होतो मराठीच्या पेपरमध्ये
इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा काय विचारला...

नाग नागीण

भयंकर पीजे :

नाग: हॅपी बर्थडे डार्लिंग!
नागिन: ओह डियर, थँक्स फॉर द
वीष

Monday, July 28, 2014

लपाछपी

प्रेयसी तिच्या प्रियकराला : आपण लपा-छपी खेळू.
तू मला शोधल्यावर तू मला शॉपिंग ला घेऊन जयचे....
प्रियकर : जर मी शोधू शकलो नाही तर????
प्रियसी : जानू.... असे नको ना म्हणू.....
.
.
मी इथेच,दरवाज्याच्या मागे लपते..

Friday, July 25, 2014

डॉक्टरचे प्रेमपत्र


प्रिये,
तुला आलिंगन एक चमचा,
चुंबन तीन चमचे,
दिवसातून तिन वेळा, दोन्ही एकाच वेळी, खरं सांगू, हे लिहीताना माझी छाती इतकी धड्धडते आहे, की स्टेथॅस्कोपचे बोंडूक मी माझ्याच छातीला लावलेय !
तू माझ्या दवाखन्यात घुसलीस आणि म्हणालीस, "मी किनई एका डॉक्टर नवऱ्याच्या शोधात आहे, पण डॉक्टरला कुठला एवढा वेळ? म्हणून मीच एकेका डॉक्टरची व्हिजीट घेतीय. हे माझे कार्ड, पसंत पडले तर कॉन्टॅक्ट करा !"
झालं ! त्याच क्षणी तू माझ्या ह्रुदयाच्या डाव्या जवनीकेत जाऊन बसलीस. ह्रुदयाचा आकार थोडा वाढला आहे , रागावू नकोस, तुझ्या आकाराबद्दल मी बोलत नाहीये. त्या दिवसापासून माझी नाडी तुझ्या चालीप्रमाणे झोके देत चाललीय. माझ्या छतीच्या 'एक्स रे' त तुझीच छबी आलीय. स्टेथॅस्कोपमधुन तुझाच मंजुळ आवाज ऎकू येतो. मी तुला ह्रुदयाच्या तीन रुम किचन ब्लॉकमधे सुखात ठेवीन (ह्रुदयाला चारच कप्पे आहेत म्हणुन नाईलाज आहे) .
मग माझी होशील ना ?

Tuesday, July 22, 2014

लफडी

बॉसने सेक्रेटरीला फोन केला , '' एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत . त्यासाठीची सगळी व्यवस्था कर .''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला , '' एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर .''
नव-याने प्रेयसीला फोन केला , '' एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे . तू माझ्या घरीच राहायला ये .''
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला , '' मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे . तुला ट्यूशनला सुट्टी .''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , '' बाबा , माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे . मला कुठेतरी घे‌ऊन चला ना फिरायला .''
बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला , '' हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार आहे . बाहेरगावी जाणे रद्द .''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला , '' बाहेरगावी जाणे रद्द .''
नव-याने प्रेयसीला फोन केला , '' आपली भेट रद्द .''
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला , '' माझे जाणे कॅन्सल झाले आहे . तुझी ट्यूशन सुरूच राहील .''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , '' ट्यूशन सुरूच राहणार आहे . आपलं जाणं रद्द .''

Saturday, July 19, 2014

उशिराचे कारण

जाधव साहेब 
एकदम कडक ऑफिसर , 
स्टाफने उशिरा आलेलं त्यांना अजिबात चालायचं नाही.
उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा.
त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं
तब्बल दहा जणांना केबिन मधे बोलवण्यात आलं,
सगळे लाइनित खाली मान घालून ऊभे होते . जाधव साहेबांच्या डोळ्यातून अंगार निघत होता आणि त्याची धग एसी त पण जाणवत होती.
एवढ्यात प्यून मिठाइचा बाॅक्स घेउन आला
साहेब उठले जळजळीत नजर टाकत त्यांनी प्रत्येकाच्या हातात मिठाइ दिली आणि म्हणाले खा.
कोणाला काहीच कळत नव्हतं पण सगळ्यानी मिठाइ खाल्ली.
"अभिनंदन" जाधव साहेब गरजले
"मला अतिशय आनंद आहे की आपल्या ऑफिस मधल्या दहा लोकांच्या बायका प्रेग्नंट आहेत आणि त्याहूनही आनंद म्हणजे सगळ्यांची सोनोग्राफी आजच होती"
"मुर्खांनो मश्टरवर कारण लिहिताना सेम अॅज अबोव लिहीता , अरे वरच्याने काय लिहीलय हे वाचायची तरी तसदी घ्या".
" Get out all of you."


Wednesday, July 16, 2014

पत्र

चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते.
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते.
तरी तिने चंदुला आधी पत्र लिहिले आणि मग पूर्णविराम देऊन टाकले मध्ये मध्ये. ते असे....

प्रिय प्राण नाथ, तुमची आठवण येते
माझ्या मैत्रिणीला. काल
मुलगा झाला आजीला. दम्याचा त्रास
होतो कुत्रीला. आज चार पिल्ले
झाली मामाला. दाढी करताना ब्लेड
लागली वहिनीला. दवाखान्यात अँडमीट केले
बकरीला. हजार रुपयात विकले आत्याला.
नमस्कार तुमची लाडकी गंगू..


Thursday, July 10, 2014

गाढव

आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस च्या मागे एक गाढव मरून पडलं होतं ,
एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन 
लावला
“मग आम्ही काय करू”- पलीकडून उर्मट प्रश्न आला
अत्रे शांतपणे म्हणाले,”
“तुम्ही काही करू नका
मृतांच्या नातेवाईकांस कळवण्याची पद्धत आहे म्हणून फोन केला एवढच..” 

Monday, July 7, 2014

भांडण

चित्रपटगृहाच्या बाल्कनीत एक जोडपे बसलेले होते.
त्याचं बाळ खूप रडत होते,
खालून आवाज येतो...
"ए पाज की त्याला..."
नवरा उठून उभा राहतो आणि म्हणतो
"कोण आहे रे त्यो ....!!
दम असेल तर मला बोल फुकणीच्या........."
सगळीकडे शांतता पसरते..
.
.
.
.
.
.
थोड्या वेळाने खालून आवाज येतो
"ए त्याला बी पाज...."


Wednesday, July 2, 2014

आईची शिकवण



एकदा एका मुलाला त्याच्या आईने
शिकवण
दिली की
मोठ्यांचा आदर
करायचा बसमध्ये
गाडीत
बसलेला असताना
एखादे
आजी किंवा आजोबा उभे
असले तर
त्यांना बसायला जागा द्यायची.


एका दिवशी मुलगा बसने
चालला होता व त्याने
पहिले
जवळच एक
आजी उभ्या आहेत.

तसा तो मुलगा उठला व
म्हणाला, "आजी बसा ना"

आजी म्हणाल्या,"नको"

थोड्या वेळाने
पुन्हा व म्हणतो,
"आजी बसा ना"

आजी रागानेच म्हणतात,
"नको म्हणाले ना एकदा,
तूच बस."

मुलगा थोडा वेळ
गेल्यावर
पुन्हा आजीला विनवू
लागला "आजी बसा ना"

तशा आजी ओरडल्या,
आता परत बस म्हणालास
तर फटका देईन, तूच बस"

मुलाने घरी गेल्यावर
आईला सर्व गोष्ट
सांगितली.

आई म्हणाली, "तू
दारा जवळच्या सीटवर बसला असशील
आणि त्यांना दारात
बसायला भीती वा
असेल."

मुलगा म्हणाला,
"नाही ग आई, मी दारात
नव्हतो बसलो."

आई विचारते, "मग कुठे
बसला होतास."

मुलगा म्हणतो,
.

.
.
.
"मी आपल्या आजोबांच्या मांडीवर
बसलो होतो."